मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४८.

पो जेष्ठ वद्य ७ मंगळवार.
श्रीशंकर
१६९० ज्येष्ठ वद्य ५

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण. दिक्षित स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी कृष्णराव बल्लाळ कृतानेक सा नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें विशेष. कृपा करून पत्र पा तें पावलें. गंगातीरीं मुकाम किती होणार, हें ल्याहावें ह्मणोन लिा. त्यास, अद्याप कूच्य मुकामाचा निश्चय ठरला नाहीं. परंतु बहुतकरून कूच्यच होईल. मुकाम व्हावयाचें कारण नाहीं. आपणास कळावें ह्मणोन लिा आहे. श्रीमंत राजश्री दादासाहेब चांदवडाहून कूच जाहल्याचें वर्तमान आलें नाहीं. आज सायंकाळ पो येईल, श्रीमंताचे कुच पुणतांबियाचेच रोखें होईल, युद्ध-प्र- संग संभव आहे, ऐसें दिसोन येतें. पहावें. ईश्वर इच्छा प्रमाण ! बहुत कार्य लिहिणे ? 'लोभ असों दिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries