मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १५२.


१६९८ चैत्र वद्य ७.

अजम मेस्तर बाढम ईस्कोयेर कोशलदार बंदर सुरत दाम महबतहू :-
छ मलाज मुख लिसान दस्तगाहाय अतिजाद दोस्ताआन. आजीज्यानीब चिंतो विठ्ठल सलाम आंके. येथील खैरखुशी जाणून आपली खैरअफीयत कलमीं करीत जावी. दिगर. अजम उइलिम हारनबी जनराल यांस खत अदमीयासोबत पाठविलें आहे. त्यास, ज्याहाजावरून आदमीयाची रवानगी करून मुंबईस पोंहचत ऐसें करावें. व तिकडून जबाब घेऊन येईल त्यास ईजानेबानजीक पोंहचाऊन द्यावें. रो। छ २१ सफर. दराज काय लिहिणें ? हे किताबत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries