मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १४८.


१६९८ चैत्र वद्य ५.

राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. धौशाचे विद्यमानें नबाब निजामअल्लीखांचें राजकारण आलें आहे. परंतु, जनरालाकडून खातरजमा प॥, त्याविसीं जनरालासीं तुह्मीं बोलिलेंत, त्यांनी उत्तर केलें तें सविस्तर लिहिलेंत तें समजलें. त्यास ये गोष्टीचा अर्जू धौशाची फार आहे कीं, जनरालाकडून पक्की खातरजमा असावी कीं, पक्ष करणें तरी श्रीमंताचाच करूं हे न घडे तरी फितुरीयांकडे कदापी होणार नाहीं. असें लिहिण्यांत यावें व कोणी आमचा विश्वासूक सुरतेस येईल त्याची तेथेंच खातरजमा व्हावी, असे भाव आहेत. त्यासी येविसीं जनरालांनीं धौशाचे नांवें पत्र पाठवावें कीं, श्रीमंतांचें वडिलांचें बोलणें ठरेल. त्याप्रों तुह्मी त्यांचे उपयोगीं पडावें, इकडील संशय कोणेविषयीं न धरावा, आह्मी पुरंदरकर यांचा पक्ष करणार नाहीं, कोणेहि औशीं त्यांची कुमक करणार नाहीं, खातरजमा असों देणें. म्हणून पत्र आह्माकडे पाठवावें, हा उत्तम पक्ष. हें न घडें तरी, याच अन्वयें आमचें तऱ्हीं नांवें पत्र पाठवावें कीं, धौशे व नबाब निजामअल्ली यांनीं तुची कुमक केलिया आम्हांस खुशी आहे. त्यांचे हाते आपण काम करून घ्यावें. पुरंदरकरांची आह्मीं कोणेही औंशीं करणार नाहीं, पत्र साफ यावें, आणि गंभीरास येक जनरालाचें यावें कीं, धौशे व निजामअल्ली यांकडील कोणी तुम्हांकडे भला माणूस आला तरी तुम्हीं खातरजमा करणे. पुरंदरकरांची कुमक जनराल व आह्मीं करणार नाहीं, फुरसत पडली तरी श्रीमंतांचीच कुमक करूं असें पत्र सुरतवरून यावें. ह्मणजें या कार्याचें साधन पक्कें. धौशाचें पत्र साफ आलें आहे. त्याची नकल करून पाठविली असे. तीच जनरालास वाचून दाखवावी. मजकूर ठेवावा. मुख्य पक्ष धौशास जनरालाचे तरजमेविसीं बिनकिलाफ यावें व गींरही लि॥पों यावें. जर धोशास पत्र देत, तरी आमचे तऱ्ही नांवें पत्र अन्वयें यावें. हें जलद करून पत्र धौशाचे मजकुराविसीं सरकारचें पत्र ह्मणून जनराल ह्मणत होते, असें लिहिल्यांत. त्याजवरून तुमचे लिहिले जनरालांस पत्र पाठविलें असे. हें त्यांस ऊन, धौशाचे खातरजमेचें पत्र लिहिल्याप्रमाणें जें येईल तें घेऊन सत्वर पाठवावे. जनरलांस पत्र लिहिलें आहे. त्याचा सोदा तुम्हांकडे पा।. असे. मजकूर त्याअन्वयें बोलणें. जाणिजे. छ. १९.

(लेखनावधि)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries