मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १५०.


१६९८ चैत्र वद्य ६.

राजश्री लक्षुमण आपाजी गोसावी यासि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. कारनेल आपटण याणीं सरकारांत पत्र लिहिलें आहे त्याचा दर जबाब एक खुशकीच्या मागें रवाना केला असे व येक हालीं तुह्मांकडे पाठविला आहे. तरी तुह्मीं जनराल यांचे विद्यमानें मशारनिलेकडे रवाना करणें. अपटणास पत्र लिहिलें आहे त्याची नक्कल पाठविली आहे ही पाहून नजरालास सविस्तर अर्थ समजावणें. जाणिजे. छ २० सफर. बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries