मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक २४३.

१६९६ श्रावण शुद्ध १३.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाळाजीपंत आपा स्वामीचे शेवेसी :-
पो। कृष्णाजी सिवदेव सां।। नमस्कार विनंति. उपरी. येथील कुशल ता।। श्रावण शुध १३ मुकाम अवंतिकापुरीं येथें स्वामीचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असो. विशेष. बहुत दिवस स्वामीकडून पत्र येत नाहीं तर ऐसें न करावें. सदैव पत्रीं परामर्ष करीत असावें. आह्मीं येथें रबीचे वरातेकरितां पेचांत पडलों. निदान कोठें ठिकाण लागेना तेव्हां मामलत करणें प्राप्त जाहाली. बाकीची रुजुवात करून निघेल ते वसूल करून पाठवितों. आणि मीहि लौकरच स्वामीचे भेटीस येतों. कार्तिक मासीं कांही ऐवजाची तोड पाडून लौकरच येतों. इतके दिवस श्रम केले त्यासारखे ऐवज वसूल करून पाठविला ह्मणजे सार्थक. नाहीं तरी व्यर्थ रिकामें येऊन काय सांगावें ? यास्तव याचा निकाल करून घेतल्यावरी येतों. कळावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries