मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक ३४४.

१७२२ पौष व॥ ८.

मशरुल अनाम देशमुख व देशपांडे, पो।। उत्राण यांसी
कासीराव होळकर सु॥ इहिद्दे मया तैन व अलफ राजश्री त्रिंबकराव चिंतामण यानी श्रीमंताचें पत्र छ ६ रजबचे आणिलें की प्रांत खानदेश येथील कानगोईचे वतन खंडोगंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती पेशजी सरकारांत केली होती त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण याजवर कृपाळू होऊन यांचे हिश्शाचे वतनाची मोकळीक केली आहे तरी तुह्माकडील मामलेदार व जमिनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल यांजकडे वतन चालत होतें त्याप्रों।। यांजकडे चालवणें ह्मणोन त्यावरून हें पत्र सादर केले आहे तरी तुह्मी सरकारसनदेप्रों।। परगणे मजकूर येथील कानगोईचे वतनाचा हक्क रुसू व इनाम व घरे व मानपान कानूकायदे सुध्धा पेशजी चिंतो विठ्ठल यांजकडे सुदामत चालत आल्याप्रमाणें मशारनिल्हेकडे चालवणें व कागदपत्राचा सिरस्ता पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्या अन्वये यांचे दफ्तरी देत जाणें जाणिजे छ २२ साबान मोर्तब सूद.
  
      344                                                                 340 1 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries