मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                               पत्रांक १४.

इ. स. १७६५ ता. १८ जून                                              श्रीशंकर.                                                       १६८७ ज्येष्ठ वद्य ३०


सेवेसी चिंतो विठल सां। नमस्कार विनंति. येथील वर्तमान सविस्तर राजश्री कृष्णाजी गोपाळ व गोविंद माहादेव आपल्यास सांगतील. श्रीमंतांना अकृत्रिम कृपेचे भाव व खातरजमेचीं अक्षरें मा।रनिलेजवळ सांगितली आहेत. मजला पुढें यावयाची आज्ञा केली आहे. ऐश्यास आपण स्वार होऊन पुढें यावें. पिंपळगांवपरियंत मी इकडून येतों. याउपरीं कोण्हे गोष्टीविसीं लढा राहिला नाहीं. किल्ल्याची चिठी आह्मांजवळ श्रीमंतांनी दिल्ही आहे. सर्व प्रकारें निखालस होऊन यावयाचें करावें. बहुत काय लिहिणे ? हे विनंति. रा। मंगळवार तिसरा प्रहर.

हें पत्र शिंद्यांच्या दरबारांत प्रमुखत्वानें वागणा-या राघोराम इत्यादि कारभा-यांनीं नारोशंकरांस लिहिलें आहे. यांत महादेव गोविंद काकडे यानें आततायीपणा करून कसा स्वघात करून घेतला, याचें वर्णन आहे. हें वर्णन त्याचा नाश करणाच्या कारभा-यांनी केलें आहे, तेव्हां यावर जपूनच विश्वास ठेविला पाहिजे. मात्र शिंद्यांच्या दरबारांत व पेशव्यांच्या दरबारांत शिंद्यांच्या सरदारीबद्दल कोण उलाढाली चालल्या होत्या, घावडाव कसे चालत होते, यांचें बरेंच स्पष्ट चित्र या पत्रांत रेखाटले आहे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries