मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                               पत्रांक १६.

इ. स. १७६५ ता. ३ जुलई.                                            श्रीशंकर.                                                       १६८७ आषाढ वद्य १ 

राजश्री नारोपंत नाना ( राजेबहाद्दर) गोसावी यांसिः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। माहादजी शिंदे दंडवत. विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशललेखन करीत असावे. विशेष तुम्हीं छ. १९ जिल्हेचे पत्र पुजियाचे मुक्कामीहून पाठविलें ते छ १० मोहरमी नजीक मुकुंदबारी येथील मुक्कामी पावोन लिहिला मजकूर सविस्तर कळला. ‘दरबारचा बंदोबस्त घेऊन तुम्हांस वस्त्रें सत्वरींच पाठवितों चिंता न करावी’ म्हणोन लिहिले. उत्तम आहे. तुम्हीं प्रसंगीं असतां आम्हांस कोणेविशीं फिकीर आहे असें नाहीं. पूर्वी राजश्री विष्णु माहादेव याचीं पत्रें आलीं. तेथें लि॥ होतें कीं ‘सहा लक्ष पर्यंत नाना आम्हीं मिळोन बोलोन पल्यावरी आणिलें आहे’ म्हणोन, ऐसियासि त्या पत्राचीं उत्तंरे व त्याबमोजिव आपणांसहि पत्रें लिहून पा। आहेत. त्यावरून सविस्तर कळेल. माहादजी गोविंद याचें वर्तमान तेथें कळल्यावरी काय मजकूर, श्रीमंताची मर्जीचा प्रकार कसा आहे, हें सविस्तर ल्याहावें. आपण दरबारचा बंदोबस्त करून सनदा व वस्त्रें पाठवावीं. श्रीमंतांपाशीं जो करारमदार तुम्हीं कराल याप्रमाणें ऐवज आम्ही देऊं. दरबारचा निखालस जाबसाल होऊन सनदावस्त्रें आली म्हणजे पुढें कामकाजास जावयासी कोणेविशीं चिंता पडणार नाहीं. याकरितां लि।। असे रा।. छ १४ मोहरम *बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.

16 1                                          16 2

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries