मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

शके १६४५ शोभकृतनाम सवत्सरे वैशाख शुध द्वादसी तदिनी समस्त गोतगगा याप्रती तकरीर कर्दे नारायेणभट बिन वीरेश्वरभट व गोपालभट बिन रुद्रभट गिजरे जोतिषी मौजे कारवे व मौजे वडगाव व मौजे सेरे व मौजे दुसेरे व मौजे कोडोली प्रा। क-हाड यानि तकरीर केली ऐसी जे आमचे मूलपुरूष रामेश्वरभट गिजरे यानिं सदरहू गाव पाच हे जोतिषवृत्ति व कुलकरणीयाच्या घरीचे उपाध्यपण ऐशा. दोनी वृत्ति सपादिल्या त्या वृत्तीस आह्मी व वाईकर गिजरे व दुसेरेकर गिजरे ऐसे त्रिवर्ग भाऊ यानी भक्षाव्या ऐसे आहे हे खरे करून देऊ सापृत सदासिवभट गिजरे बोलताती की आपले तीर्थरूप भानभट यानी मोरेश्वरभटापासी रामेश्वरभटाच्या नावाचे दानपत्र एक व पिलभटाच्या नावाचे मुतालिकाचे पत्र येक ऐसी दोनी पत्रे दिल्ही ह्यणताती त्यास मोरेश्वरभट असता हे व आह्मी येकेठायी होतो तेव्हा काही बोलिले नाहीत आता तो मोरेश्वरभट नाहीत याकरिता आह्मी सदासिवभटास श्रीकुलस्वामीच्या देवालयात श्री ची शफत उभयेतास करून बोली केली तालिका आसतील अथवा मोरेश्वरभटाचे हातीचा कागद अथवा साक्षी आसतील तरी श्रीपासी आणा आह्मी आपली पत्रे आणितो तालिकास व आसलास ऐक्यता जाहली ह्यणजे तुमची पत्रे खरी ऐसे बोलिलो त्यास सदासिवभट बोलिले की तालिका व मोरेश्वरभटाचे हातीचा कागद साक्ष ऐसी तिन्ही नाहीत ऐसे श्री चे साक्षीने बोलिले त्यास राजश्री श्रीनिवास परशराम प्रतिनिधी याचा हुज-या दाजी कदम साक्ष आहे त्या उपरातिक सध्याकाली बाबदेवभट याचे घरी जाऊन त्यास हि श्रीगृहपती साक्षी करून हे च विचारिले त्यानी ही सदासिवभटासारिखे उत्तर दिल्हे त्यास साक्ष पुरुषोत्तमभट आफले व धोडभट वालिबे हे उभयेता आहेत त्यानतर दादभट ढवलीकर वास्तव्य वाई हेहि साक्ष आहेत यासी मोरेश्वरभट परधामास गेले आता व्यवहार हे करिताती तरी यानी कोल्याच्या मुकामी वाईकर व दुसेरेकर व आपण ऐसे त्रिवर्ग भाऊ वृत्ति त्रिवर्गाची ऐसे लेहून आह्मास दिल्हे आह्मी हि तैसे च लेहून त्यास दिल्हे आहे त्या प्रमाणे त्यानी खरे करून दिल्हे ह्मणिजे वृत्ति त्यांची खरी हे पत्रे दोनी दिल्ही ह्मणताती ते आह्मास ठावकी नाहीत आह्मी त्रिवर्ग भाऊ खरे वृत्ति त्रिवर्गानी भक्षावी ऐसे आहे हे भोगवटियामुले व गोतमुखे व पत्रद्वारे खरे करून देऊ यासि अन्यथा जाहलो तरी गोताचे आन्याई या वेगले आमचीं तीनपत्रे राजिकात पुस्तकाबराबरी गेली बि ता।

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries