मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १५७

श्रीविद्याशकर
श्रीमत्छकराच्यार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि

श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व ग्रहस्त क्षेत्रक-हाटक या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे या नंतर साप्रत पुष्यशुध नवमीस श्रीची पुण्यतिथी ब्राह्मणसतपर्ण उत्सव आहे या करिता लिहिले असे तरी आपण सहसमुदाय येऊन महोत्साव
साग केला पाहिजे आनमान न करणे बहुत काय लिहिणे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries