मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १६३

श्रीशंकर

आर्यस्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर श्रीमत्छकराचार्यान्वयसजातअभिनवश्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजेश्री समस्त ब्रह्मवृद व ज्योतिषी ऊपाधे व देशपाडे व समस्त गृहस्त वास्तव्य क्षेत्र- क-हाटक परमभक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण ईछीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणून आपले क्षेमकल्याण लिहून आशिर्वाद सपादित असणे या नतर साप्रत पुष्यशुद्ध नवमीस श्री ची पुण्यतिथी आहे तरी आपण समुदायसहवर्तमान येऊन मोहोत्छाव साग सपादून गेले पाहिजे हे विषई अनमान न कीजे सुज्ञा प्रती विशेष काय लिहीणे जाणिजे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries