मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २२६
१७७८ फाल्गुन शु ।। ५

बारनिशीपत्रक देहाय गावगना, निर्बधपत्र पाठविली त्याचा तपशील

नाना व सिताराम भेट उब्राणी पालकर या देशात , साप्रदाय नसून मठाधिपत्याचे पत्र श्री.स्वामीकडून करून घेतले त्याजबद्दल निर्बंधपत्रे पाठविली ती बी ।।                    आरलेस, हरीपत मोकासी याज बा॥
१ मौजे तारले पत्रे गेली ती बी।।     १ मौजे पाल १ मोकदमास
१ मौजे इदुली                            १ हरीपतास
१ मौजे उब्रज                            १ बापूनाईक
१ मौजे चरेगाव                          १ शामराव देशपाडे
३ मौजे कासीळ                        १ आपा दाजी देशपाडे
१ बोरबन                                 १ राणूबाई मोकसीण
१ मौजे तालुके तारगाव               १ चरण मोकदमास
१ मौजे वेणेगाव                         ३ कुरले पत्रे
१ मौजे अतीत                           १ मोकदमास
१ मजरे तुकाईचीवाडी                १ बाबाजी अराणके वालीत
१ मौजे चाफळ                         १ बलवत आपाजी शुधपत्र
१ सस्थान चाफलकर बवा
१ मौजे पाडली
१ मौजे निनाम
१ सासपड
१ मिरली व चोरे
१ चोरे कालगाव
१ सिरगाव
सदर गावास पत्रे लिहिली त्यातील हशील मजकूर वो। रो। नाना व सितारामभट बिन कृष्णभट उब्राणी वा। मजकूर याणी इकडील देशातील पूर्वी पासून साप्रदाय मठाधिपत्याचा नसून श्रीस्वामीजगद्गुरु याज पासून मठाधिकाराचे आपले नावे मशारनिलेनी पत्र करून घेतले त्यावेलेस पाली मुकामी आमचे क्षेत्रा पैकी मडळी तेथे होती त्याणी श्र जगद्गुरूचे समक्ष मा।रनिलेस ताकीद केली नतर ते समयी पत्र राहिले पुढे त्यानी आह्मास न कलता परभारे नेहले हा मजकूर क्षेत्री श्रुत जाहल्या वरून तुह्मास लिहिले आहे त्यास पदप्रायश्चित्तआचारव्यवहार वगैरे जे करणे ते क्षेत्राहून होत आले याची माहिती आपणा हि आहे असे असून क्षेत्राचा अधिकार आपण करावा ह्या दुर्बुद्धीनें पत्र करून घेतले हा मजकूर क्षेर्त्री श्रुत जाहला या स्तव ते क्षेत्राचे द्रोही आहेत याज करिता आपणास लि॥ आहे तरी भटजी उब्राणी यासी व याचे घरी येकपक्ती अन्नोदकव्यवहार न करणे असा निग्रह ठेऊन पत्राचे उत्तर पाठवावे व पुन त्याज विसी स्वामीचे पत्र आले असता कोणी मानू नये कळावे बहूत काय लिहिणे हे नमस्कार व अनुक्रमे आशीर्वाद मिति शके १७७८ फाल्गुनशुद्ध ५ सदर्हू प्रो। वर गाव लिहिले आहेत त्यास पत्रे लिहिली असेत

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries