मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २२७
१७७८ फाल्गुनवद्य १३ बाळबोध

श्री
वेदमूर्ति राजश्री समस्त ब्रह्मवृद व देशमुख व देशपाडे व ज्योतिषी व कुळकर्णी व राजकीय ग्रहस्थ मौजे काशेगाव याशि
समस्तब्राह्मणक्षेत्रकरहाटकस्थकृत नमस्कार व अनुक्रमे अशिर्वाद विशेष पूर्वी पासून आचारव्यवहारपदप्रायश्चित्त कर्ण्याचा अधिकार क्षेत्राचा पूर्वापार असून त्या प्रमाणे वहिवाट चालत अस्ता पेशजी जगनाथपत हासबनिस याज वर काहि अरोप अला होता ते समयी शिराळकर यानि क्षेत्राची अवज्ञा केली तेव्हा क्षेत्रस्थमडळी जाउन शिराळकर याचा कागद लेहून घेतला त्यात हाशील की क्षेत्राचे अज्ञे प्रमाणे वागणूक करू आणि पदप्रायश्चित पूर्वी पासून तुह्मी करित अला त्या प्रमाणे तुह्मी करावे असा अहे नतर मशारनिले हासबनीस याज कडून प्रायश्चित करउन शुध केले असे असून हाली विनाकारणी शिराळकर दाडगाहि करतात या स्तव ते क्षेत्राचे द्रोही अहेत 

त्यास शिराळकर व बिळासकर ज्योतिषि याचे घरी कोणी अन्नोदकव्यवहार येकपक्ति करू नये असा निर्बध ठेवावा आणि श्रीस्वामिशकराचार्य याचे पत्र शिराळकर यानी आणिल्यास मान्य करू नये अणि पत्राचे उत्तर यावे कळावे हा नमस्कार व अनुक्रमे अशिर्वाद शके १७७८ फालगुणवद्य १३

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries