मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

रवानगी पत्रें छ २ जावल                                                               लेखांक ५८.                                                           १७१४ पौष शुद्ध ४.
मीर मोहसन अलीखान याणी मागीतली
सबब बळवंतराव लक्ष्मण सेकूकर
व गिरमाजी विठल यांस.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष कसबे विसाद सरकार नांदेड एथील जागीर मोह सनुदौला बाहादूर यांजकडे आहे तेथील सालाबाद मामुल प्रा फडच्या सुरळीत करून देत असतां तुह्मी ज्यादा तलबी करून इजाफा दोन हजार च्यारसे रुपये घेतले व कसबे मारची मवेसी गुरें व बकरी नेली मन माने तसा हंगामा करून नुकसानी व पायमाली केली याचा बोभाट नवाबाचे सरकारांत जाला त्यावरून येविषई आह्मास सांगितले कीं हा ऐवज बेमामुल घ्यावयाची सबब काय मामलतीचे ऐवजी सदरहु ऐवज मजुरा घेउ या प्रा बोलण्यांत आलें त्यावरून लिहिलें असे त्यास गैरवाजबी मामुलासिवाय ज्याजती ऐवज घेतला तो यांचे यांस फिरोन देऊन रसीद घ्यावी व पुढें सालाबाद सुदामत पेशजीपासोन मामुल चालत आल्याबमोजीब फडच्या करून घेत जावा बोभाट येउ नये रा छ २ ज्ञावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries