मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३७८]                                                                       श्री.                                                        ३ मार्च १७५१.

पै॥ फाल्गुन वद्य १० सोमवार
शके १६७२

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी नागोराम भागवत चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना त॥ फाल्गुन वद्य द्वितीया मु॥ हसनाबाद, नजीक बेदर येथे स्वामीचे कृपादृष्टीकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जाहलों ते मजल दरमजल श्रीमंतांजवळ नांदेडाअलीकडेस कापशीचे मुक्कामी पावलों. श्रीमंतांस खानाचें पत्र देऊन वर्तमान स्वमुखें जें त्यांहीं सांगावयास सांगितलें होतें ते सर्व निवेदन केले. त्यास श्रीमंताचीही मर्जी माघारें फिरावयाचीच होती. परंतु नांदेड टाकून अलीकडेस आले. दुसरें, नवाब निजामअल्ली यांची पत्रें आली व तमाम पाळेगार ये प्रांतीचे येऊन भेटले. तमाम मुलकाच्या खंडण्या घेत, भागानगर डावें टाकून कर्नूल कडप्याचे रोखें लष्करचे सुमारें चालले. खानास पत्र श्रीमंतांही लिहिलें, त्यावरून सर्व वर्तमान कळेल. सदैव आशीर्वादपत्रीं सांभाळ करावा. रा. फत्तेसिंग भोसले येऊन भेटले. सेवेसी श्रुत होय हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries