मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद व. ५ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. पूर्वा नक्षत्र अखेरपर्यंत इकडील तमाम प्रांतीं पर्जन्याची वृष्टी फार जाली. कितेक ठिकाणीं मूग उडीद वगैरे जिनसांस पाणी लागुन खराब जाले. पाऊस उघडावा यैसें सर्वत्रांस जालें, उत्तरा नक्षत्र सगळें कोरडें गेलें. वापसे जाले, कितेक जागा रबीच्या पेरण्या जाल्या. खरीफ चांगलें आलें. सांप्रत तेरा चौदा सेर जौरी येथें धारण १ तालुकियांत सतरा आठरा शेर याप्रों आहे. सारांष, साल मारि हंगामसीर धारण जसी व्हावी तसी होईल असें चिन्ह दिसतें. पर्जन्य चांगले जाले. रा छ. १७ माहे सफर हे विज्ञापना.

श्री.
अखबार झा छ. १० ता छ, १६ माहे सफर रवानाजीला असे. रा। छ. १७ माहे मजकुर सन १२०३ फसली, हे विज्ञापना. छ २१ सफरी पुण्यास डांकेवर.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries