मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद व ५ मंगळवार शके १७१५.

विज्ञापना राजश्री बाबाराव गोविंद यांस पुणीयास जाण्याची रुखसत नवाबाची आलो याची विनंती पूर्वी लिहिलीच आहे. दौलाचा निरोप व्हावयाचा. त्यास. दौलाचे हवेलीस नबाब येक दिवस आले होते. आणि पागेवाल्याकडील कारभारही दौलाचेथें नित्य दीड प्रहर रात्रपर्यंत दोन तीन दिवस सतत होत आहे, त्याजमुळें बाबाजीराव यांचें निरोपाचें अद्याप जालें नाहीं. इतक्यावर जसें ठरेल त्याची विनंती मागाहून लिहितों. रा छ १७ सफर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries