मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. १३ बुधवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. “पागेवाल्याकडील तालुकियाचा कारभार महमद अजीमखान यांजकडे नवाबांनीं सांगोन दौलाची त्यांची सफाई केली. " इत्यादिक तपसीलें. विनंती पेशजी लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. व्यंकटराव याजकडे आलंद, गुंजोटी, हासनाबाद तीन तालुके दिल्हे. वरकड तालुकियाची अमीली सिदी इमाम याजकडे सांगितली. अद्याप अमील रवाना जाले नाहींत. या उपरी होणार, अजमखान व घांसीमियां दौलाकडे रोज येतात जातात. मागील हिसेबाचाही मागती घोळ पडला आहे. व्यंकटराव यांचे मानस सिदीकडे तालुके असो नये. तथा आदावतीमुळें इजाफ्याच्या फर्दा वरचेवर देतच आहे. तालु ( कि ?) यावर इजाफ्याचे यैवजा ....... राद निंर्वेध बंदो...... ही नाहीं. याप्रो। तुर्त पागा प्र ........ खाने पडलें आहे पुढें काये रंगावर येतें पहावें. पागेवाले याजवर हात फिरला नवता. अमानत होते. त्याजवरही कारभारी यानीं युक्तीनें हात घातला, तेव्हां पागेचे कारभारास कीड लागली, तेव्हां परिणाम समजलाच आहे. रा छ, १७ सफर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries