मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे---मिस्तर ईष्टवट याचे रुबरू इंग्रज फरासिसाचे बिघाडाचा बयान नवाब व मध्यस्ताचे बोलत असतां इष्टवट बोलला कीं “इंग्रजाचे बादषाहानें फरासिसासी जंग करण्याचा सरंजाम करून तयारी केली. हे बातमी फरासीसास समजल्यानंतर त्यांनीं आपली मजबुती करून लडाईस सिद्ध जाले, लडाईचे अगोधर इंग्रजाकडील .... .... जाहजें दर्याहून येत असतां फरासीसांना जमियतसुधा जाहाजावर चालून जा .... .... जाहाजें जबरदस्तीनें नेली. त्याजवर येक लडाई इंग्रज फरासीसासीं होऊन इंग्रजांनीं त्यांचीं जाहाजें कांहीं आणिलीं. याप्र।। वर्तमान आलें, '' ऐसें बोलण्यांत. सारांश इंग्रज फरासीसाची लडाई रुबकार आहे. दोंहीकडूनही जमाव, सामान सरंजाम पोख्त. काय घडतें पाहावें. हीं वर्तमानें सरकारांतही मालिट वगैरें कडून आलींच असतील. येथें ऐकिलें त्याची विनंति लि॥ असे. र॥ छ, १५ जिलकाद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries