मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-नवाबाचे समक्ष मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिलें कीं “मिस्तर बैद इंग्रज............पलटणाचे जमियेतसुधा महेश्वरा........अहिल्याबाई यांनीं तुकोजीराव होळकर............कुमकेकरितां रवाना केला तो मार्गी येत असतां सिंद्याकडील सरदारास बातमी समजल्यावरून त्यांनीं अंबोजी इंगळे यांस पांच हजार फौजेनसी त्याचे तोंडावर रवाना केलें. एक ब एक येऊन इंगळे यांचे फौजेसी व इंग्रजी पलटणासी मुकाबिला जाला, तीनच्यार पलटणें इंग्रजी लोक मारून लुटून ताराज केले. या प्र। वर्तमान आलें. यावरून ताजुब होतो कीं इंग्रजी पलटणें चार असतां पांच हजार सवारांनीं लुटून घ्यावीं असे सर्वथैव घडूं नये. ज्या गोष्टी न घडावयाच्या त्या घडतात. तस्मात् जिकडे येश तिकडे हे सर्व प्रकार होतात.” याप्र।। बोलले. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries