Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ शु. ८ मंगळवार शके १७१५.
विनंति, उपरि राव रंभा यांचे ह्म(ण)णें कीं सालगुदस्तां मोहरमाबाबत साडेसात हजार कर्ज आपल्याकडें होतें तें माहवारीचे ऐवजांत दरमाहा एक हजार प्रा तीन हजार वजईचे पोटीं आदा जाले. माहे जिल्कादपर्यंत मोहरमचा ऐवज फिटून दीडहजार रुपये जाहले. इजाफा जाले आहेत. याचें उत्तर आह्मीं केलें कीं मोहरमचा ऐवज किती व कोटून कोठपर्यंत वजा घेतला असतां फडच्या हें आह्मांस ठाऊक नाहीं. गोविंदराव यानीं माहवारीऐवजीं तीन हजार वजा घेत जावें ऐसें लिहिल्यावरून तीन हजार मात्र वजा होत आले. परंतु यांत मोहरमाबाबत किती? व पटणचे स्वारीचे वगैरे कर्ज किती? हें समजलें नाहीं. बाजीचें ह्म(ण)णें आपण लिहून पाठवावें.याउपरि मोहरमचा ऐवज वजा न करितां माहवारी देत जावी त्यास मोहरमाबाबत ऐवज तुह्मीं यांस किती दिल्हे आहे व त्याचा करार कोणते महिन्यापासोन वजा किती करून घ्यावयाचे ? याचा तपशील लिहून पाठवावा व पटणचे स्वारीबाबत वगैरे कर्ज कोण महिन्या पासून कोठवर आदा व्हावयाचें हेंही ल्याहावें. त्याप्रा समजोन करितां येईल. उत्तर लौकर यावें. र॥ छ ७ जिल्हेज, हे विनंति.