मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ शु. ८ मंगळवार शके १७१५.

विनंति, उपरि रावरंभा यांचे बोलण्यांत कीं करमाळ्यांतील खर्चाबाबत दोन हजार रुपये माहवारीचे ऐवजीं वजा घेण्यांत आले. त्यांस करार असा नाहीं कीं तालुक्यांतील कारखान्याचा खर्च माहवारींत मजुरा घ्यावा. ऐसें असतां तो देखील खर्च माहवारींत वजा करून रोखे घेतात तसे देतों, याप्रा। मध्यस्तासी बो(ल)ले. त्यांनीं बजाजीपंतास विचारिलें कीं याचा ब्याहडा ठरला आहे त्यांत हें कलम कसें उगवलें आहे ? यानीं सांगितलें येक ब्याहडा गोविंदराव यांजपासीं व येक बाजीसाहेबापासीं आहे त्यांत पाहावें लागेल. बाजीचें ह्म(ण)णें तालुक्यातील हाती, घोडे वगैरे खर्च व मोहरमाबाबत ऐवज माहवारीसीवाये. आमचें बोलणें कीं माहवारीचे पोटीं. हे विना ब्याहाड्यासीवाये समजत नाहीं. यास्तव राव रंभा याचें कारभारप्रकर्णी ब्याहाडा जाला आहे त्याची नकल इकडे पाठवून द्यावी. ह्मणजे दोन्हीं रकमा ब्याहाड्यांत उगवल्या असतील त्याप्रा मध्यस्तासीं बोलून अमल होईल. कितेक कलमाचे जाबसाल पडतात. यास्तव ब्याहाड्याची नकल येथें असली ह्मणजे प्रसंगोचित जो जाबसाल नमूद होईल त्याचें निराकरण करावयास नीट पडेल. यास्तव ब्याहाड्याची नकल पाठऊन द्यावी. रा। छ. ७ जिल्हेज. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries