मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व० ३० गुरुवार शके १७१५

आखबार इ।। छ २३ जिल्हेज त।। छ ९ मोहरम शनिवार पावेतो. रवाना छ १५ मोहरम हे विज्ञापना.
छ. २८ मोहरमी रवानगी पत्रें टप्यावर.

श्री.
श्रावण व. ३० गुरुवार शके १७१५.

श्रीमंत राजश्री----रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं
विनंती. सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा॥ नमस्कार विनंती. विज्ञापना, त॥ छ, २८ माहे मोहरम पर्यंत मु॥ बेदर येथें स्वामीकृपावलोकनकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान सविस्तर छ. १६ माहे म॥रीं लेखन करून पत्राची रवानगी डांकेवर केली त्यावरून ध्यान्यांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमानाची विनंती आलहिदा पुरवणी पत्रीं लि॥आहे. अवलोकनें त॥ मार ध्यानांत येईल उत्तरें रवाना होण्याविषयीं आज्ञा करणार स्वामी समर्थ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries