मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व.३० गुरुवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. टिपु सुलतान यांजकडून शुतर स्वारासमागमें मध्यस्तास पत्र छ २३ मोहरमीं आलें. मध्येस्तांनीं पत्र वाचून आपले मर्जीसहींत नवाबाकडे पाठविलें. नवाबांनी मुलाहिजा करून टिपुकडील पत्राचा जबाब तयार करण्याकरितां फिरोन मध्यस्ताकडे पाठविलें. त्यानंतर मध्यस्तांनीं जबाबाचा मसविदा ठरविला. छ २४ रोजीं दुसरे दिवसीं मध्यस्ताकडे आह्मीं गेलों ते समंई त्यांनीं टिपुकडून आपल्यास पत्र आलें त्यांतील म॥र व जबाब रवाना करण्याचा याचा बयान करून पत्र आलें. तें व जबाबाचा मसविदा दाखविला. याचा त॥ आलाहिदा पुरवणी पत्रीं विनंती लिहिल्यावरून ध्यानांत येईल. छ. २५ रोजीं नबाबाकडे मध्यस्त जाऊन जबाब ठरविला तो दाखविला. याउपरी शुतर स्वारास जबाब देऊन रवानगी होईल. र। छ. २८ मोहरम हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries