संस्कृत भाषेचा उलगडा

तसेच एकच प्रत्यय वचनाचे किंवा लिंगाचे दर्शक नव्हते, फक्त कारकाचे दर्शक होते. पुढे लिंगभेद उत्पन्न झाल्यावर प्रत्ययातही लिंगभेद उत्पन्न झाला. कित्येक विभक्तीप्रत्यय केवळ स्त्रीलिंगी शब्दांना लागत व कित्येक केवळ पुल्लिंगी शब्दांना लागत आणि कित्येक शब्द असे असत की ते पुल्लिंगी मानावे की स्त्रीलिंगी मानावे या संबंधानें समाजाचा अद्याप निश्चय झालेला नव्हता. अशा अनिश्चित शब्दांना विकल्पाने वक्त्याच्या लकबीप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे किंवा सामाजिक रूढीप्रमाणे पुंप्रत्यय किंवा स्त्रीप्रत्यय लागत. अशी अनिश्चित स्थिती असता पाणिनीय काल आला आणि पाणिनीयभाषा म्हणून जीस म्हणतात ती भाषा स्थिर झाली. ती स्थिर जर झाली नसती म्हणजे ती बोलणारा समाज स्थिर म्हणजे मृत जर झाला नसता, तर तीत उत्तरोत्तर विकार व बदल अवश्य होत गेले असते. ज्याअर्थी असे विकार झालेले पुढे दिसत नाहीत त्याअर्थी पाणिनीय भाषा बोलणारा समाज पाणिनीनंतर काही काळाने मृत झाला व त्याची जागा प्राकृत भाषा बोलणाऱ्या इतर समाजांनी घेतली. तो इतिहास निराळा, सबब आढावा इथेच पुरा करतो. पाणिनीय भाषेची पूर्वपीठिका थोडक्यात अशी :
१) साधी तुटक शब्दांची अप्रत्यय भाषा प्रथम असलेली दिसते.
२) नंतर प्रथम वचनाचे प्रत्यय जन्मास आले.
३) नंतर विभक्तीप्रत्यय जन्मास आले.
४) नंतर लिंगभेद होऊं लागला.
५) तो परिपूर्ण होतो न होतो इतक्यात पाणिनीयभाषा स्थिर म्हणजे मृत झाली.
येथे सुबन्त प्रकरण संपले. आता तिङन्ड प्रकरणाला म्हणजे धातूंच्या वर्गीकरणाला,
पृथक्करणाला व विवेचनाला प्रारंभ करू.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries