संस्कृत भाषेचा उलगडा

२ संस्कृत व वैदिक भाषात धातूंच्या पुढे जे प्रत्यय येतात ते मुळात सर्वनामे आहेत ही बाब सर्वमान्य आहे. तत्रापि ती सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत या बाबीचा उलगडा अद्याप कोणी केलेला नाही. हा उलगडा आरंभितांना सर्व लकारांतील तिन्ही पुरुषी जे प्रत्यय येतात त्यांचे पृथक्करण करणे अवश्य होते. करता प्रथम पुरुषापासून पृथक्करणाला आरंभ करतो. परस्मैपदी रूपात लट्च्या प्रथमपुरुषी एकवचनात जसे ति हे सर्वनाम येते, तसे आत्मनेपदी रूपात ते हे सर्वनाम येते. ति व ते या दोन सर्वनामांपैकी ते चा अर्थ तो स्वत: खास असा आहे व तिचा अर्थ तो दुसऱ्याकरता असा आहे. ते या सर्वनामात स्वत: ति या सर्वनामात दुसऱ्याकरता हे अर्थ कोठून आले? ति व ते या सर्वनामात त् हे अक्षर सामान्य आहे. त्यात स्वत: किंवा दुसऱ्याकरिता हे दोन अर्थ असणे संभवत नाही. तेव्हा इ व ए या दोन स्वरात हे भिन्न अर्थ असणार हे उघड आहे. स्पष्टच झाले की ति व ते हे सर्वनाम शब्द साधे नाहीत, जोड आहेत. मूळ सधा सर्वनामशब्द त् आहे. अर्थात् प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत अद् त् इ, व कश् त् ए अशी तीन शब्दांची वाक्ये असत, अद् ति, व कश् ते, अशी दोनच शब्दांची वाक्ये नसत. एवढ्यानेच अवयवीकरण संपले असे नाही. अद् त् इ व कश् त् ए या वाक्यात असा भेद आहे की पहिल्यात फक्त इ हे सर्वनाम आहे व दुसऱ्यात अ + इ = ए अशी दोन सर्वनामे आहेत. म्हणजे कष्ट या रूपात क्श् त् अ इ असे चार शब्द आहेत. अद् त् इ या वाक्याचा अर्थ तो खातो असा आहे व कश् त् अ इ या वाक्याचा अर्थ तो स्वत: जातो असा आहे. या वाक्यांचे हे दोन भिन्न अर्थ का होतात, ते त्यातील सर्वनामांच्या अर्थावरून सांगता येते. त् म्हणजे तो ह्न ती ह्न ते आणि इ म्हणजे सन्निकृष्ट हाह्न हो ह्न हे. अद् त् इ म्हणजे हा तो खातो. कश् त् अ इ या वाक्यात त् म्हणजे तो, अ म्हणजे अगदी अलीकडला हा आणि इ म्हणजे सन्निकृष्ट हा. कश् त् अ इ म्हणजे अलीकडला सन्निकृष्ट असा जो हा तो जातो. त् चा अर्थ तो याबद्दल वादच नाही. इ म्हणजे हा व अ म्हणजे अगदी अलीकडला हा हे अर्थ या शब्दांचे कोणत्या आधारावर बसविले ? ज्या आधारावर हे अर्थ बसविले तो आधार असा. इदम् एतद् अदस् व तद् या चार सर्वनामांचे अर्थ सांगणारी खालील कारिका सुप्रसिद्ध आहे :
इदम स्तु संनिकृष्टं समीपतरवर्ति चैतदो रूपम्
अदस स्तु विप्रकृष्टं तदिति परोक्षे विजानीयात् ॥१॥

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries