संस्कृत भाषेचा उलगडा

५६ दुसरी तऱ्हा अशी : अनेक या अर्थाच्या एकाच शब्दाने बहुत्वाचे दर्शन करीत. हे बहुत्ववाचक शब्द अन् व त्रि किंवा तृ हे शब्द होत. अन् हे सर्वनाम दोन तऱ्हांनी योजीत. अनेकवचनाचे प्रत्यय अजून निर्माण झाले नव्हते, सबब अन् हा शब्द दुसरी याअर्थी एकसंख्यादर्शकही योजीत व दुसरे अन्य याअर्थी अनेक संख्यादर्शकही योजीत. भवति या रूपात भो+अ+त्+इ असे चार शब्द आहेत व त्यांचा अर्थ तो होतो असा आहे. भवन्ति या रूपात भो + अन् + त् + इ असे चार शब्द आहेत व त्यांचा अर्थ (अन् म्हणजे बहुत) बहुत ते होतात असा आहे. अभवन् यारूपात अ+ भो+ अन् असे तीन शब्द आहेत व त्यांचा अर्थ अनेक झाले असा आहे. अभवन्त या रूपात अ+भो+अभ्+ त्+अ असे पाच शब्द आहेत व त्यांचा अर्थ ते स्वत: झाले असा आहे. भवन्ति, भवन्ते, अभवन्, अभवन्त, भवन्तु, भवन्ताम्, भवान्, भवान्ते या आठ रूपात अन्+ त् असे दोन शब्द किंवा नुसता अन् असा एक शब्द योजिलेला आहे. त् म्हणजे तो, अन् त् म्हणजे ते अनेक व अन् म्हणजे अनेक. या अन् सर्वनामाला या सर्वनामाचा जोड होऊन अन्य हे जोड सर्वनाम झाले आहे आणि एक या सर्वनामाचा जोड मिळून अनेक हे जोड सर्वनाम झाले आहे. अन्य म्हणजे बहुत जे ते. अनेक म्हणजे बहुत एक.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries