संस्कृत भाषेचा उलगडा

५९ त्रिवचन, अनेकवचन ऊर्फ बहुवचन प्राथमिक आर्य कसे साधीत त्याचे दर्शन येथपर्यंत केले. मागे तस्, ताम् वगैरे जोड सर्वनामांचे पृथक्करण करताना द्विवचन कसे साधीत त्याचा अंशत: निर्देश केलाच आहे. आता द्विवचनसाधनाचा आंशिक निर्देश येथे परिपूर्ण करू. भवेते असे आत्मनायक प्रथमपुरुषाचे लटांत रूप आहे. येथे द्विवचनाचा बोध कसा होतो? वैदिक भाषेत लटाच्या प्रथमपुरुषाचे एकवचन जसे शयते, सेवते, स्तवते, तोषते असे तकारयुक्त होई, त्याप्रमाणेच शये, सेवे, स्तवे, तोषे असे तक्राराशिवाय एकारयुक्तही होई. ते हे जोड सर्वनाम त् + ए या दोन सर्वनामांचा जोड होऊन झाले आहे. त् + ए म्हणजे तो हा स्तवते म्हणजे तो हा स्तवतो. स्तवे या रूपात फक्त ए हे एकच सर्वनाम आहे व या रूपांचा अर्थ हा स्तवतो असा आहे. मुळात स्तवते व स्तवे ही वाक्ये होती व ती स्तव् धातू व ते किंवा ए ही सर्वनामे मिळून झाली आहेत. दोन्ही वाक्यांचा व रूपांचा उपयोग वक्त्याच्या इच्छेप्रमाणे सररहा होत असे. स्तवे हे एकवचनी रूप आहे. या एकवचनी रूपातील ए सर्वनामाच्या पुढे ते हे जोड सर्वनाम योजून पूर्ववैदिककाळी द्विवचन साधीत. स्तवे + ते = स्तवेते. स्तवेते म्हणजे हा व तो हा असे दोघे स्तवतात. ए म्हणजे हा आणि त् + ए म्हणजे तो हा. अस्तवेताम् व स्तवेताम् या रूपातही ए व ताम् अशी दोन सर्वनामे आहेत. ए म्हणजे हा आणि त् + आम् म्हणजे तो हा. अस्तवेताम् म्हणजे हा व तो हा असे दोघे स्तविते झाले. स्तवेताम् म्हणजे हा व तो असे दोघे स्तवीत. परस्मैपदी भवत: अभवताम् व भवताम् या तीन रूपांचाही ऊह वर प्रमाणेच करावा. त् + अस् = तस् म्हणजे तो व तो असे दोघे. त् + आम् म्हणजे तो व हा असे दोघे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries