संस्कृत भाषेचा उलगडा

६० प्रथमपुरुषाच्या एकवचनाची साधनिका धातूपुढे त् + ए किंवा नुसता ए घालून होत असे. द्विवचनाची साधनिका त् व अस् अशी दोन एकार्थक सर्वनामे उच्चारून किंवा त् व ए अशी दोन सर्वनामे किंवा त् व आम् अशी दोन सर्वनामे उच्चारून होत असे. या च धर्तीने प्रथमपुरुषाच्या अनेकवचनाची साधनिका त् हें सर्वनाम तीनदा उच्चारून किंवा एकाच अर्थाची तीन, सर्वनामे उच्चारून व्हावयास पाहिजे होती. परंतु ती तशी न होता, तू या सर्वनामा पाठीमागे अन् हे सर्वनाम योजून किंवा र् हा संख्यावाचक शब्द योजून अनेकवचन साधिले जाई. म्हणजे अनेकवचनाची साधनिका द्विवचनाच्या साधनिकेहून अगदी निरळ्यातऱ्हेवर होत असे असे झाले. याचा अर्थ इतकाच की, प्राथमिक भाषेत बराच काळ फक्त एकवचन व द्विवचन अशी दोनच वचने प्रचलित होती. नंतर अन्य किंवा तीन या अर्थाचे शब्द भाषेत निर्माण झाले व त्रिवचन किंवा बहुवचन द्विवचनाच्या धर्तीवर न साधिता साक्षात्, अन् हा शब्द त् च्या पाठीमागे योजून किंवा त्रिर् हा शब्द त् किंवा अम् किंवा अन् यांच्या पूर्वी योजून बहुवचन साधू लागले. लिटांत, मात्र, पूर्वीचाच आवृत्तीचा प्रघात सुरू होता. लिटांत एकवचन स् ने, द्विवचन स् + स् ने व त्रिवचन स् + स् + स् ने स् ची एकदा, दोनदा व तीनदा आवृत्ती करून दाखवीत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries