मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४

पो छ १९ सफर आश्विन शु०१
श्री.
१६८४ श्रावण वद्य ७

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोनेर स्वामीचे सेवेसीः-

पो माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र यमुनापलिकडचे मुकामचें पाठविलें तें प्रविष्ट जालें. सुजातदौलाकडील वगैरे कित्तेक मजकूर लिहिला तो सविस्तर कळला, ऐशियास, तुह्मीं प्रस्तुत सुजातदौलाजवळ आहा, हें उत्तमच केलेंत. सारांश, सरकारचीं ठाणीं गेलीं आहेत तीं हस्तगत...... ऊन, राजेरजवाडे वगैरे संस्थानिक यांस साहित्यपत्र व तुमच्या पत्राचे समर्पक उत्तरहि पाठविलें जाईल. जाणिजे, छ २१ मोहरम, सु। सल्लास सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries