मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ८

श्रीशंकर
१६८५ ज्येष्ठ शुद्ध ५

श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसीः-

चरणरज मेघःशाम कृष्ण कृतानेक सां नमस्कार विनंती येथील कुशल ता ज्येष्ठ शुद्ध ५ पावेतों मुकाम पुणें सुखरूप असों. विशेष. बहुत दिवस जाले, स्वामीकडून आशीर्वादपत्र येऊन सांभाळ होत नाहीं. तरी ऐसें न करावें. सदैव आज्ञापत्र पाठवून सेवकाचा परामृश करीत असावें. यानंतरी इकडील राजकी वर्तमान तरीः श्रीमंत राजश्री पंत प्रधान मिरजेवरी आले आहेत. मिरजेस वेढा च्यार रोज बसवून, चौथे रोजीं फत्ते करून, आपलें ठाणें बसावलें, ऐसें वर्तमान आहे. सेवेसी श्रुत होय, ह्मणून लिा आहे. पुढें जें वर्तमान होईल त्याप्रमाणें सेवेसी लिा पाठऊं. वरकड वर्तमान यथास्थित असे. सर्व प्रकारें अभिमान स्वामीस आहे. बहुत काय लिहिणें ? कृपा असों दिजे. हे विनति.

हेंच पत्रीं श्रीमंत रा गोविंद दीक्षित व ती रा। रामचंद्र दीक्षित स्वामीचे सेवेसीं साष्टांग विनंति लिा परीसिजे. कृपा लोभ असों दिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries