मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५

श्री.
१६८४ भाद्रपद वद्य ९

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री लक्षुमणपंत स्वामी गोसावी यासि:-

सेवक महादजीराम बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता भाद्रपद वा ९ मा पुणें कुशल असों. विशेष........इकडील मजकूर तर राजश्री रामभटबावा व राजश्री बाबूराव व राजश्री रामचंद्रपंत ऐसें पुणियास आले आहेत. श्रीमंताची भेट जाहली. अद्यापि जाबसाल कांहीं नाहीं. रा। पंतसचिव यांजकडीलहि प्रकार पूर्ववतप्रमाणेंच आहे. XXX येथील मजकूर तर राजकीः- राजश्री त्रिंबकराव मामा कारभार करीत असेत. श्रीमंत राजश्री दादासाहेब नाशकास गेले आहेत. समागमें फौजे दोन हजार असे. अविंव बेदरी आहे. आधिकोत्तर लिहावें ऐसें नाहीं. यानंतरीं: तुझांकडून रा पिराजीनाईक निंबाळकर यानीं रुपये साहा हजार चैत्रमासींच देविले आणि आपण लिहिलें, गडकरी यांची वीस हजार रुपयाची रा नाईक निंबाळकर यांनी चिठी पाठवून दिल्ही. X XXXX. रा निंबाळकर याची......श्रीमंताकडे च्यार हजार फौजेनिशीं जाहली. आणि बारा लक्ष रुपये घ्यावे ऐसा करार जाहला. प्रस्तुत हालीं दोन लक्ष रुपये दिल्हे व लाख रुपयांचा सरंजाम देणार. येणेंप्रमाणें करारांत आले आहे. रा नाईक निंबाळकर दोन हजार फोजनिशीं येथें आहेत. यानंतरी र। रघोजी करांडे याजकडे ऐवज येणें. त्यास, ते प्रांतीं अनंतशेट कोलकहि गेला असे. इ.ई. इ.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries