मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६

श्री.
१६८४ कार्तिक वद्य ४

राजश्री आपाजी पायगुंडे गोसावी यांसि:-

आशीर्वाद. सु। सलास सितैन मयावअलफ. तुमचे फौजेचा पैका पावला असतां अद्यापि येत नाहीं ! तीर्थरूप राजश्री दादासाहेंबांचे कुच नगराहून होऊन चारोळ्यास मु। आले. आम्हांस त्यांस दाहा कोसांची तफावत आहे. या प्रसंगी तुम्हीं जवळ असावें. हल्लीं पत्र लिहिलें असें. देखत आज्ञापत्र जितके लोक जवळ असतील तितक्यांनशीं जलदीनें येणें. नालबंदी घेऊन लोक गेले असतील, त्यांसहि बोलाऊं पाठवणें. तुम्हीं पत्रदर्शनीं निघोन हुजूर येणें. एक क्षणाचा दिरंग न लावणे, जाणिजें. छ १८ राखिर-लेखनसीमा.
पेशा छ १९ रा।खर, सायंकाळ.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries