मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ७२

श्री लक्ष्मीकांत.
१६९३ आश्विनशुद्ध ३

राजश्री गोसावी यांसः-

अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रो जानोजी भोंसलें सेनासाहेव सुभा सु। इसने सबैन मया व अलफ. पा आंबड हा माहाल राजश्री पंतप्रधान याकडून राजश्री तुकोजी होळकर यांसी आहे. तेथें नजर घांसदाणा घेऊ नये, ऐसा करार असे. मेजवानीचा फडशा राजश्री रामाजी बल्लाळ यांचे विद्यमानें नामपूरचे मुक्कामी हुजूर जाला आहे. तरीं सालमजकुरीं तुह्मीं थाल मजकुरास घांस दाणा वगैरे काडी इतका उपसर्ग न देणें. जाणिजे. छ २ माहे रजब. बहुत काय लिहिणें ? मोर्तबसूद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries