मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ७४

श्री ( नकल) १६९३ आश्विनशुद्ध ६

राजश्री बाळाजीपंत लेले स्वामीसः-

विनंती उपरी. किल्ले बेळगांव पैा पंन्नास माणूस राजश्री त्र्यंबकराव मामाकडे कर्नाटकांत रवाना करावयाची नेमणूक पुणियांत केली आहे. त्यास, किल्ले मजकुरीं माणसाची भरती थोडी आहे ह्मणोन राजश्री महिपतराव विश्वनाथ यांणीं सांगितलें. त्याजवरून रजबदलीमुळें पंचवीस माणुस मना करून बाकी पंचवीसासच रवाना करावयाची नेमणूक केली आहे. तरी सदरहू लिहिल्याप्रमाणें किल्ले मजकुरांतून पंचवीस माणसांची रवानगी कर्नाटकांत करवणे, रा छ ५ रज्जब, अन इसन्ने. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries