मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ७५

श्री.
१६९३ आश्विन वद्य १४

राजश्री नारो आबाजी गोसावी यांसीः-

सु। इसने सबैन मया व अलफ. किल्ले पुरंधर व किल्ले वज्रगड देखील सरंजामाचे गांव येथील सालमजकूरचा बेहेडा जाला पाहिजे. तरी सालगुदस्त सन इहिदे सबैनचा हिशेब तपशीलवार व सालमजकूर अवल सालची हजिरी ठिकाणवार व सरंजामाचे गांवची जमाबंदी वगैरे कागद बेहेड्याचे उपयोगी दरकदार कारकुनाबराबर पाठवून देणें. जाणिजे. छ २७ रजब.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries