मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ८०

श्री.
१६९४ मार्गशीर्ष वद्य ११.
राजश्री बिरोजी गारे गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोसले सेनासाहेबसुभा रामराम. सुा सलास सबैन मया व अल्लफ, मौजे पेद पेठ पोरलावल हा गांव कृष्णाजी वामन यांजकडे मोकासा सुदामतपासून चालत होता. त्यांस देवआज्ञा जाली. याजकरितां त्यांचे पुत्र रा केशवराव कृष्ण यांजकडे पेसजीं प्रों करार करून दिल्हे असे. येविषयीं पेसजीं सनदा सादर जाल्या आहेत. तर मौजे मजकूराचा मोकासा दरोबस्त मारनिलेकडे चालवणें. सालमजकुरींचा वसूल तुह्मीं घ्याल तर देणें येईल. जाणिजे. छ. २४ माहे रमजान.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries