लेखांक ८१
श्री.
१६७३ माघ शु. १५.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी-

विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे. विशेष. आपण पत्र पो पावले. कर्जाचा ऐवज तुम्हांकडे करार करून लाख रुपयांची दोन खते लिहून पा. त्यापैकी तुम्ही राजश्री शिवराम नाईक भिडे याबा ऐवज पाठविला तो येणेप्रो रु.
५९७७५ रोख ऐवज रवानगी रु ६००००. पो वजा खोटे परत रु २२५ जाता बाकी.
२५००० हुंड्या सातारियाचे साहुकारावर पाठविल्या. त्या साता-यास येथून रवाना केल्या आहेत. तेथे ऐवज जमा जाल्याचा जाब येईल तेणेप्रो ऐवज जमा होईल.
२०० हुंडीस
--------

८४९७५
८७०० मोहरा नाणे ६०० दर १४।। प्रमाणे अवरंगाबादी हाली शिक्का
--------

९३६७५
एकूण त्र्याण्णव हजार सहाशे पंचाहत्तर रु सदरप्रो आले असत. रा छ रबिलावल, सु इसन्ने खमसैन मया व अलफ. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries