लेखांक ७९.
श्री.
१६७२ चैत्र वद्य ६. वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी-

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल चैत्र व ।।६ पावेतो जाणून स्वकीय कुशल लिहीत जावे. विशेष. आपणाकडून सांप्रत विस्तारे पत्र येऊन वर्तमान कळत नाही. ऐसे नसावे. येथील वर्तमान तरी- सात महिने येथे आलियास जाहले. रिकामे किरकोळ अर्थ दोन्ही माहालांत आम्हांविंशी मनांत आणून राजश्री स्वामीशी कजिये करितात. राजश्री स्वामी तो मळमळीत. दोन्हीकडे आहेत. आणखी किती दिवस गुंता होईल नकळे. एतद्यर्थी कांही दैवी उपाय वो। बापूभट टोकेकर यांजकरवी आपण करावावा, कीं राजश्रीची कृपा चित्तांत आहे ते वृध्दीस पाऊन आम्हांस निरोप देत. ऐसे महिन्यापंधरा दिवसा अलीकडे होय असे असले तरी करावे! परंतु, बहुत लौकिकही कार्याचा नसावा. द्रव्यवृध्दि अति करतां येत नाही. याचा विचार आपले विचारे कसा तो ल्याहावा. जे काळी जे होणे असेल ते ल्याहावे. परंतु उद्योग आहेत. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries