लेखांक ८२.
श्री.
१६७४ चैत्र शु.।। ७.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी-

विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावे. विशेष. सरकारांत ऐवजाचे प्रयोजन आहे. याजकरितां सदाशिव दादाजी कारकून आपणांकडे पो आहेत. तरी ऐवजाची तरतूद करून सत्वर लिहून पाठवावे. त्यासारिखे राऊत ऐवज आणण्यासाठी पाठऊं अगर तेथेच ऐवज कोणास देणे असिला तरी देवऊं. ऐवज किती द्यावयाचा असेल ते लिहून पाठवणे. त्याप्रमाणे खत लिहून पाठवूं. व्याजाचा करार राजश्री भगवंत भैरव यांचे पत्री लिहिला आहे ते सांगतील. ऐवज क्षेपनिक्षेप तरतूद करून ल्याहावे. सत्वरच प्रविष्ट होईल. रा छ ५ जमादिलावल. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries