लेखांक ८५.
श्री.
१६७४ कार्तिक वद्य ७. अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरहर लक्ष्मण गोसावी यांसी-
सेवक बाळाजी राऊ प्रधान नमस्कार सु।। सलास खमसैन मया व अलफ. तुम्हांस जप्ती करावयास आज्ञा केली आहे. तर येणेप्रो-
प।। पैठणपैकी गांव वजा जयाजी शिंदे
१ बिड किनगांव
..............
...................
ज्याची त्याजकडे दिल्ही असेत. हे खेरीज करवणे. वरकड प।। सदरहू प।। येथील कुल जप्ती उठवायाची आज्ञा केली असे. तर, तुम्ही जप्ती उठवणे. जो वसूल घेतला असेल तो घेणे. रोखा..... घेतला असेल तर फिरोन न देणे. या उपर मोगलाई अमलास मुजाहीम न होणे. वाईन प।। पंधरा गांव येथील मोगलाई जप्तीच्या सनदा जे आणतील त्यांजकडे जप्ती देणे. तोपावेतो तुम्ही जप्त करणे. जाणिजे. छ २० मोहरम. आज्ञा प्रमाण.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries