मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक २४८.

१६९६ भाद्रपद वद्य १.

राजश्री चिंतो विठ्ठल स्वामी गोसावी यांसि विनंति उपरी हैदर नाईक याजकडे सालगु॥ तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबीं ऐवज करार केला त्यापैकीं राजश्री कृष्णाजी नाईक दातार यांस दोन लक्ष रुपये द्यावयाचा ठराव तुमचे विद्यमान अप्पाजीराम याजवळ जाहाला त्याविसी मागें तुमचें व नाईकांचें पत्र घेऊन अप्पाजीराम यांजकडे पाठविलें होतें. त्याचे जाब आले ते पाहून नाईकांस दाखवून राजश्री नारो अप्पाजी याजकडे पाठविले आहेत ते तुह्मांसी बोलतील. त्यास येविसी फिरोन कागदपत्र काय लागतील ते तयार करवून नाईक सांगतील त्याप्रमाणें ऐवज आणावयाची तर्तूद करून ऐवज सरकारांत सत्वर येईं तें करणें + जाणिजे छ० १३ रजब सु॥ खमस सबैन मया व अलफ* हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries