मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १५०

श्रीविद्याशकर

श्रमित्परमहसादियथोक्त बिरुदाकितशृगेरीसिहासनाधीश्वर-
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकरकजोभ्दवश्रीविद्याशकरभारतीस्वामिनारायणस्मरणानि

स्वस्ति श्रीमद्वेशशास्त्रसपन्न षट्कर्मनिरत राजमान्य राजश्री समस्तब्रह्मवृद व समस्तदीक्षित वास्तव्य क्षेत्र करहाटक या प्रति विशेषस्तु तुह्मी पत्र पाठविले प्रविष्ट होऊन लेखनार्थनवणतृप्तीने चित्तानद जाहला पत्रार्थ की केशोपतास शुधपत्र दिले सारखे क्षेत्री प्रायश्चित्त घ्यावयासी आज्ञा करावी ह्मणोन तरी बहिष्कृतपत्र देता तुमच्या समते राजश्री रत्नाकरपताचे गुजारतीने दिल्हे शुधपत्र तुह्मी मागता च दिल्हे पूजाद्रव्य सस्थानास तुह्मी प्रविष्ट करावे ऐसे निर्गम जाहाले नतर येथे तो कशास पाहिजे केसोपत तुह्मा पासी आहे प्रायश्चितविधि करवून पूजाद्रव्य पाठवावे येथे वेचास पाहिजे तो अर्थ वेदमूर्ति माणिकभटाचे वाग्विलासे कळेल माहुलीकराचे उत्धटपण वेदमूर्ति जगो दीक्षिता समक्षा बोलणे जाहले ते सागता कळेल पुढे प्रसगास तुह्मास विदित असावे ह्मणून लिहिले असे सुज्ञा प्रति बहुत लिहिणे काय असे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries