मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १४७

श्रीशकर श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिव्हभार
तीस्वामिकरकजोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतना-
रायणस्मरणा

सकलगुणालकरण हरिभक्तिपरायण राजमान्य राजश्री गो। नारायण दीक्षित वास्तव्य क्षेत्र करहाटक क-हाड या प्रती विशेषस्तु तुमचे कल्याण ईछीत करवीरक्षेत्री छत्रसभासमवेत श्रीनिकट असो तदनतर येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे या नतर साप्रत पौष्य' सीत' नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे.तरी आपण सह समुदाय येऊन मोहोत्साव साग सपादून गेले पाहिजे ये विशई अनमान न करणे बहुत काये लिहिणे श्रीच्या पुण्येतिथी करिता रा। साबाजी . गो। व रा। उमाजी गो। व रा। रामकृष्ण गो । व मसुरास पत्रे पाठविली आहेत पावती करऊन ते यात्रेस येत ते गोष्टी करणे जाणिजे


Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries