मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १४८

श्रीविद्याशकर

श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकृतनारायणस्मराणानि

सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे क्षेत्र क-हाटक या प्रती विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छीत करवीरक्षेत्री श्रीनिकट राहिलो असो तदनतर साप्रत पुष्य शु।। नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे तरी तुह्मी समुदायसहित आले पाहिजे आणि तत्प्राती क्षेत्रास व राजश्री रुद्रमुनी व उमाजी गोसावी व वाईमाहुलीस पत्रे लिहून आपणा कडे पाठविले आहे तरी मुद्दाम येवडी पत्रे प्रविष्ट करवणार सुज्ञ असा सप्तऋषी वगैरे पत्रे लिहून पाठविली आहेत येवडी पावती करावी आपणा करिता निश्चिती असो जाणिजे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries