मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २३१
१७७९ आषाढवद्य ११

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण
क्षेत्रकराड यासी

समस्त ब्राह्मण कसबे मसूर साष्टाग नमस्कार विनति विशेष वेदमूर्ति राजश्री नानाभट बिन कृष्णदीक्षित व सीतारामभट बिन बाबादीक्षित उमराणी पालकर याणी या देशातील साप्रत मठाधिपत्याचा अधिकार क्षेत्रमजकूरचा असोन दुर्बुद्धीने आपले नावे सस्थानाकडून आज्ञापत्रे करून घेतली त्यास ते क्षेत्राचे द्रोही याज करिता त्याचे घरी येकपक्ती अन्नोदकवेव्हार करू नये असे क्षात्राहून पेशजी फाल्गुनशु॥ १ शके १७७८ चे पत्र आले त्याचे उत्तर पूर्वी आपा जोशी बिन बाळकृष्ण जोशी क्षेत्र मजकूर याज बरोबर फाल्गुनशु।। ११ शके मजकूरचे पाठविले च आहे हाली सस्थाना कडून श्रीस्वामीजगद्गुरु याचे पत्र फाल्गुन वा॥ ३ शके मजकूरचे मितीचे आले ते आज आपास वा। ५ शके १७७९ दिवसी वा। सीमारामभट उमराणी याणीं दिल्हे त्याची नकल करून आपणा कडे पाठविली आहे मनन होऊन पत्राचे उत्तर जरूर यावे अनमान करू नये कळावे बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनति मिति आषाढवा॥ ११ शके १७७९ पिंगलनामसवत्सरे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries