मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २३४
१७८० अधिक ज्येष्ठ शु॥ १० बाळबोध

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री समस्त ब्रह्मवृद श्रीक्षेत्रक-हाटकस्थ स्वामी यासि
कागद बेशमी धोडभट बिन चितामणभट जोतिषी मौजे वोड प्रात क-हाड तालुके वाळवे कृतानेक साष्टाग नमस्कार विज्ञापना लिहून दिला कागद ऐसा। जे क्षेत्रा हून बोटका साळी याचे खटल्या बदल मौजेमजकुरी पत्र आले त्या पत्रा प्रमाणे आह्मा कडून वहिवाट न झाल्या मुळे आपले निर्बधपत्र आह्मास आले त्याज वरून आह्मी क्षेत्रास आलो त्यास आपले पत्राचा अपमान केला ही चूक आमची आहे इत पर असे करणार नाही आपले आझे प्रमाणे वागेन हा कागद लिहून दिला सही मिति शके १७८० कालयुक्तनामसवत्सरे मिति अधीक जेष्ठ शुक्ल दशमी हे विज्ञापना खुद धोटभट बिन चितामणभट पाठक जोतिषी मौजेमजकूर

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries