मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २३२
१७८० वैशाखशु।।१ सुमार

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र
कराड स्वामी गोसावी यासी

मोकदमानी मौजे वाडे पेठा पेठ तो। वालवे कृतानेक साष्टाग दडवत विज्ञापना तागायत वैशाखवा। ६ पावे तो आशीर्वादे करून येथास्थित असे विशेष आपले कडून वैशाखशु।। १ शके १७८० चे मि।। चे पत्र आले त्यात लि।। की कुशा बोटका साळी सभापूरकर याजवर दोष आहे त्या सासर्गी साळई तुमचे गावात नादत आहे त्याचे घरी लग्न वगैरे काही जाहल्यास तुमचे जोशी याणे त्याचे कार्यास जाऊ नये ताकीद करावी ह्मणून त्याज वरून आमचे गावचा चितामणभट बिन बापूभट जोसी यास ताकीद करून आपले पत्र आले ते हि वाचून दाखविले परतु त्याने पत्राचा धिक्कार केला की हे पत्र समस्त ब्राह्मणाचे नव्हे मध्ये कोणी तरी तोतयाणे दिल्हे असेल असे ह्मणोन निघोन गेले आणि काल मिति वैशाखवा। ५ स सभापुरकर याचे सगतीचे साळी याची लग्ने लाविली पुढे मर्जीस येईल तसे करावे सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries