मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. मलंगुर येथें जमीदार मुफसदाचा आठा जमा होऊन पांच साहा हाजार जमियत मिळाली. किला मुफसदांनीं घेऊन तालुक्यांत हांगामा माजविला. त्यांचे तंबी करितां महंमद अजम बीडवाला याची जमियत दोन हजार सवार व तैनाती यक हजार. येकुण तीन हजार स्वार व च्यार हजार पयदलची जमियत मुसारेहमु व अबदुल करिम पैकीं. व हैदराबादेहून पांच तोफा समागमें बारूदचा सरंजाम घेऊन जाण्याची परवानगी होऊन अजमखान बीडवाला यास रुखसन मलंगुरास जाऊन जमीदाराची तंबी कर करण्याची जाली. छ. ८ रावलीं अजमखान बीडवाला आपले मेळा सुधां येथुन तीन कोसांवर कुच करून गेला. मलंगुर मागती किलेदारानें घेतलें, यैसेंही वर्तमान आज याचें सरकारांत आलें, तेव्हां जामियत त्या कामाकरितां रा। जाली तेही माघारी येईल यैसें दिसतें, होईल त्याप्रा ता लिहीन. या छं. १० माहे रावल हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries