मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. १ रविवार शके १७१५.

श्रीमंत राजश्री----------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं---------

विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापना ता छ. माहे रावल पर्यत मु बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचे वर्तेमान येथास्थित असें विशेष. इकडील वर्तमान छ. १० माहे मारी डांकेवर तपशीलवार विनंती लिहिल्यावरून ध्यानास आलें असेल. सांप्रत येथील वर्तमानाची विनंती अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिली आहे. अवलोकनें भार ध्यानांत येईल. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञाकरणार स्वामी समर्थ, सोळावें मोहरम पासून आज पारियेंन दाहा रवानग्य (1) पत्राच्या जाल्या. येकाचेंही उत्तरें लिहावयास आज्ञा न जाली, याजकरितां विनंती लिहिली असे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries